• योजना

1.शालांतपुर्व शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना-

1.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक-इडीडी-2003/प्र.क्र.70/सुधार-2 दि.15 नोव्हेंबर 2003.

2. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक:अपंग -2013/प्र.क्र.91/अ.क.2 दि.30 ऑगस्ट 2014.

अ.क्र.

महत्वाचे मुद्दे

तपशील

1.

योजनेचे नाव

शालांतपुर्व शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना

 

2.

योजनेचा उद्देश

1 ली ते 10 पर्यंतच्या वर्गात शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.

3.

योजनेसाठी निधी

राज्य शासन

4.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागु आहे.

राज्यातील शालांतपुर्व शिक्षण घेणारे अंध,अंशत:अंध,कर्णबधीर,अस्थिव्यंग,मतिमंद,मानसिक आजार,कुष्ठरुग्णमुक्त दिव्यांग विद्यार्थी.

5.

शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष

1.अर्जदार प्राथमिक इयत्ता 1 ली ते 10 पर्यंत कोणत्याही इयत्तेत शिक्षण घेणारा असावा.

2.कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या बाबतीत पायरी वर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ  देण्यात येईल.

3.मतिमंद व मानसिक आजार असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्तेचे निकष न लावता नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त मतिमंदांच्या विशेष शाळांतील प्रवेशित विद्यार्थ्यांना वयाची 18  वर्ष पुर्ण होईपर्यंत या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल.

4.अर्जदार शासन अनुदानित वसतिगृहात अथवा अनुदानित निवासी शाळेतील निवासी विद्यार्थी नसावा.

5. अर्जदार हा सामान्य शाळेत अथवा दिव्यांगांच्या विशेष शाळेत शिक्षण घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

6.अर्जदार एकाच वर्गात एका वेळेपेक्षा जास्त वेळा अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती बंद करण्यात येईल.

7.अर्जदार गुणवत्ता शिष्यवृत्ती खेरीज इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतलेला नसावा.

8.या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची मर्यादा राहणार नाही.

6.

अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

1.अर्जासोबत मागील वार्षिक परिक्षेच्या निकालाची प्रत(गुणपत्रिकेची सत्यप्रत) जोडणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराने अर्जासोबत अपंग व्यक्ती (समान संधी,हक्कांचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग) अधिनियम 1995 प्रमाणे दिव्यांगासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग असल्याचे  प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.

3.संबंधित शिक्षण संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र जोडावे

4.अर्जदाराची आधारकार्डची छायांकीत प्रत.

5.अर्जदाराचे आधारकार्ड संलग्नीत बँक खाते क्रमांक.

6.बँकेच्या पासबुकची छायांकीत प्रत.

7.बँकेचा आय.एफ.एस.सी कोड नंबर

 

7.

योजनेची वर्गवारी

शैक्षणिक

8.

अर्ज करण्याची पद्धत

1.अर्जदाराने शिष्यवृत्तीचे अर्ज शिक्षण घेत असलेल्या संबंधित शाळा/विद्यालया संबंधित शिक्षण संस्था प्रमुखामार्फत मुंबई शहर व उपनगर या जिल्हयांसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग व इतर जिल्हयांमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे प्रतिवर्षी सादर करावेत.

2.मागील वर्षी शिष्यवृत्ती मंजुर झालेल्या अर्जदाराने नुतणीकरणाचे अर्ज विहीत नमुन्यात 31 ऑगस्ट पुर्वी वरील कार्यालयास सादर करावेत.

3.नवीन अर्ज करणा-या अर्जदाराने शिष्यवृत्तीसाठी नवीन अर्ज विहीत नमुन्याप्रमाणे 30 सप्टेंबर पुर्वी वरील कार्यालयास सादर करावेत.

9.

शिष्यवृत्तीचे प्रदान

 

अ.क्र.

दिव्यांगत्वाचा प्रकार

इयत्ता

शिष्यवृत्तीचे दर- दरमहा रुपये

1.

अंध,अंशत: अंध,अस्थिविकलांग,कुष्ठरुग्णमुक्त

1 ली ते 4 थी

100/-

2.

कर्णबधीर

पायरी वर्ग ते 4 थी

100/-

3.

मतिमंद व मानसिक आजार

नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त मतिमंदांच्या विशेष शाळांतील 18 वर्षापर्यंतचे विद्यार्थी

150/-

4.

अंध,अंशत: अंध,अस्थिविकलांग,कुष्ठरुग्णमुक्त, कर्णबधीर

5 वी ते 7 वी

150/-

5.

अंध,अंशत: अंध,अस्थिविकलांग,कुष्ठरुग्णमुक्त, कर्णबधीर

8 वी ते 10 वी

200

6.

दिव्यांगांच्या कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी

-

300

10.

संपर्कासाठी कार्यालय

मुंबई शहर व उपनगर या जिल्हयांसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग व इतर जिल्हयांमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.

2.शालांत परिक्षोत्तर (मॅट्रिकोत्तर) शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना-

1.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक-इडीडी-2003/प्र.क्र.71/सुधार-2 दि.15 नोव्हेंबर 2003.

2. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक:अपंग -2013/प्र.क्र.91/अ.क.2 दि.30 ऑगस्ट 2014.

अ.क्र.

महत्वाचे मुद्दे

तपशील

1.

योजनेचे नाव

शालांत परिक्षोत्तर (मॅट्रिकोत्तर) शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची   योजना

2.

योजनेचा उद्देश

शालांत परिक्षोत्तर (मॅट्रिकोत्तर)  शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे व शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणे.

3.

योजनेसाठी निधी

महाराष्ट्र राज्य शासन

4.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागु आहे.

राज्यातील शालांत परिक्षोत्तर (मॅट्रिकोत्तर)   शिक्षण घेणारे अंध,अंशत:अंध,कर्णबधीर,अस्थिव्यंग,मतिमंद,मानसिक आजार,कुष्ठरुग्णमुक्त दिव्यांग विद्यार्थी.

5.

शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष

1. अंध,अंशत:अंध,कर्णबधीर,अस्थिव्यंग,मतिमंद,मानसिक आजार,कुष्ठरुग्णमुक्त दिव्यांग विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

2. अर्जदार मान्यता प्राप्त संस्थेमध्ये अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेला असावा.

3.अर्जदार ज्या मान्यता प्राप्त संस्थेमध्ये अथवा मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेत आहे त्याचा दर्जा माध्यमिक शिक्षणाशी समकक्ष नसावा.ते माध्यमिक शिक्षणापेक्षा उच्च दर्जाचे असावे.

4.अर्जदाराने जे शिक्षण एकदा पुर्ण केले आहे त्याच दर्जाच्या शिक्षणासाठी त्यांनी परत शिक्षणासाठी प्रवेश घेतला तर त्यास या शिष्यवृत्तीचा लाभ दिलस जाणार नाही.उदा.बी.कॉम उत्तीर्ण झाल्यानंतर प्रथम वर्ष बी.एस.ली प्रवेश घेतला असेल अथवा एका विषयात एम.ए.शिक्षण पुर्ण करुन परत एम.ए.दुस-या विषयासाठी प्रवेश घेतला असल्यास .

5.अर्जदाराने एकदा व्यावसायिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यास परत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.उदा.एल.एल.बी झाल्यानंतर बी.एड.साठी अशा प्रकारच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

6.वैद्यकीय शिक्षणामधील पदवीत्तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेर मेडिकल प्रॅक्‍टीस करावयास बंदी घातली असेल अशाच विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी पदवीत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.

7.अर्जदाराने आर्ट्स, सायन्स,कॉमर्स मधील पदवी अथवा पदवीज्जर शिक्षण अर्धवट सोडुन त्यांनी जर मान्यताप्राप्त व्यवसायिक शिक्षण तंत्रशिक्षण प्रमाणपत्र/पदविका/पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यास त्यास या शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येईल.मात्र गट –अ वगळता इतर अभ्यासक्रमामधील विद्यार्थ्यी अनुत्तीर्ण झाल्यास त्याची शिष्यवृत्ती बंद करण्यात येईल.

8.अर्जदार गट –अ वगळता प्रत्येक वर्षी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.गट-अ अभ्यासक्रमातील दिव्यांग विद्यार्थी एक वेळ अनुत्तीर्ण झाला तर शिष्यवृत्ती पुढे चालु ठेवता येईल.मात्र दुस-यांदा अनुत्तीर्ण झाल्यास शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

9.जे अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा अथवा संस्थेचा पत्र व्यवहारादृवारे अभ्यासक्रम पुर्ण करतात,अभ्यासक्रमासाठी अथवा निरंतर शिक्षणासाठी अर्जदाराला  संबंधित संस्थेचे नापरतावा शुल्क भरावे लागत असल्यास अशा विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये 500/- आवश्यक पुस्तके व साहित्य खरेदी करण्याकरिता अर्थसहाय्य देण्यात येईल.

10.जे विद्यार्थ्या पुर्ण वेळ नियमित शिक्षण घेत असतील अशाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल.या कालावधीत पुर्णवेळ नोकरी करणा-या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.

11.अर्जदार सदरहु शिक्षणासाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती खेरीज इतर कोणतीही शिष्यवृत्ती अथवा विद्यावेतन घेत नसावा.

12.अर्जदार शासनाकडुन अनुदान देण्यात येणा-या निशुल्क भोजन व निवासाची सोय असणा-या वसतीगृहात रहात असल्यास जर त्या अर्जदारास पाठयपुस्तकेवर साहित्यावर खर्च करावा लागत असल्यास अशा अर्जदारास सदरहु खर्चाकरिता वसतीगृहवाशी विद्यार्थ्यांच्या 1/3 दराने निर्वाह भत्ता देण्यात येईल.

13.अर्जासोबत वार्षिक परिक्षेच्या निकालाची प्रत (गुणपत्रिकेची प्रत) जोडणे आवश्यक आहे.

14.अर्जदाराने अर्जासोबत अपंग व्यक्ती (समान संधी,हक्कांचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग) अधिनियम 1995 प्रमाणे दिव्यांगासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग असल्याचे  प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.

15.जे दिव्यांग विद्यार्थी विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या वसतीगृहात अथवा मान्यताप्राप्त वसतीगृहातत रहात असतील व त्यासाठी त्यांना वसतीगृहाचे शुल्क लागत असल्यास अशा विद्यार्थ्यांना वसतीगृहवाशी विद्यार्थ्यांच्या दराने शिष्यवृत्ती देण्यात यावी.

16.या शिष्यवृत्तीसाठी अर्जदारास उत्पन्नाची कोणतीही अट राहणार नाही.

6.

अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

1.अर्जासोबत मागील वार्षिक परिक्षेच्या निकालाची प्रत(गुणपत्रिकेची सत्यप्रत) जोडणे आवश्यक आहे.

2.अर्जदाराने अर्जासोबत अपंग व्यक्ती (समान संधी,हक्कांचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग) अधिनियम 1995 प्रमाणे दिव्यांगासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग असल्याचे  प्रमाणपत्राची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.

 

7.

योजनेची वर्गवारी

शैक्षणिक

 

 

8.

अर्ज करण्याची पद्धत

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मुंबई शासन निर्णय दि.02. ऑगस्ट 2018 नुसार वैयक्तीक लाभाच्या योजनेअंतर्गत शालांत परिक्षोत्तर (पोस्ट मॅट्रिक) शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थी लाभार्थी यांना त्यांच्या आधार संलग्नीत बँक खात्यात रक्कम थेट जमा करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.यासाठी अर्जदार दिव्यांग विद्यार्थ्यांनी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करुन अर्ज सादर करावेत.

 

9.

शिष्यवृत्तीचे प्रदान

1) निर्वाह भत्याचे दर-

अ.क्र.

अभ्यासक्रमाचा गट

निर्वाह भत्याचे दर दरमहा दराने

 

 

निवासी

अनिवासी

1.

गट-अ

1200

550

2.

गट-ब

820

530

3.

गट-क

820

530

4.

गट-ड

570

300

5.

गट-इ

380

230

2)वाचक भत्ता-अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसोबत खालील दाराने वाचक भत्ता देण्यात येईल.

गट

वाचक भत्ता दरमहा रुपये

गट-अ.ब.क.

100/-

गट-ड

75/-

गट-इ

50/-

3)शुल्क-अर्जदारांना विद्यापीठ/संस्था/बोर्डाला भरावे लागणारे सक्तीचे शुल्क,प्रवेश फी,टयुशन फी,नोंदणी फी,गेम्स,युनियन,लायब्ररी,मॅगझिन,वैद्यकीय तपासणी यासारखी इतर दयावे लागणारे सक्तीचे शुल्काकरिता रक्कम मंजुर करण्यात येईल.विद्यार्थ्यांना भरावा लागणारा परतावा, डिपॉजिट, क्वेशनमनी,सिक्युरिटी डिपॉजिट इत्यादी सारख्या रक्कमा मिळणार नाहीत.

4)अभ्यासदौरा- व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणाकरिता ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासदौरा सक्तीचा आहे.अशा अभ्यासदौ-याच्या प्रत्यक्ष प्रवासखर्चाची रक्कम अथवा रुपये 500/- वार्षिक पर्यंत मर्यादित अभ्यासदौरा खर्च मंजुर करण्यात येईल.मात्र असा दौरा विद्यार्थ्यास अनिवार्य असल्याचे संबंधित संस्थेच्या संस्था प्रमुखाने प्रमाणित करणे आवश्यक आहे.

5) प्रकल्प(थेसीस) टंकलेखन व मुद्रण खर्च-शिक्षण संस्था प्रमुखाच्या शिफारशी प्रमाणे संशोधनात्मक कार्य करणा-या विद्यार्थ्यांना प्रकल्प (थेसीस) टंकलेखन व मुद्रणासाठी येणा-या खर्चाकरिता वार्षिक रुपये 600/- पर्यंत रक्कम मंजुर करण्यात येईल.

         

10

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात शिष्यवृत्ती जमा करणेसाठी विहीत कार्यपद्ध्ती.

शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क,व परिक्षा फी प्रदाने,निर्वाह भत्ता,विद्यावेतने विषयक योजनेअंतर्गत देण्यात येणा-या लाभाची रक्कम दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा करणेसाठी पुढीलप्रमाणे कार्यपद्ध्ती विहीत करण्यात येत आहे.

1.या योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परिक्षा फी प्रदाने ,निर्वाह भत्ता,विद्यावेतने विषयक योजनेच्या लाभासाठी शासनाने वेळोवेळी निश्चित केलेली कार्यपद्धती, अटी,शर्ती व निकष लागु राहतील.

2.अर्जदार दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परिक्षा फी प्रदाने,निर्वाह भत्ता विद्यावेतने विषयक योजने संदर्भातील ऑनलाईन अर्जासोबत त्यांच्या आधार क्रमांकाबरोबरच आधार संलग्नीत बचत बँक खत्याचा तपशील दयावा.

3.संबंधित विद्यापीठ/शैक्षणिक संस्था/महाविद्यालये,तंत्रनिकेतने सक्षम प्राधिकारी यांनी सदर योजने संबंधिच्या शासन निर्णयान्वये वेळोवेळी विहीत केलेल्या कार्यपद्धती नुसार प्राप्त अर्जाची छाननी करावी व DBT पोर्टलवर दर्शविल्याप्रमाणे कार्यवाही करावी.

4.संबंधित विद्यापीठ/शैक्षणिक संस्था/महाविद्यालये,तंत्रनिकेतने सक्षम प्राधिकारी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करताना त्यांचा आधार क्रमांकाशी (UNIQUE NUMBER) (AISHE CODE) अथवा विद्यापीठ शैक्षणिक संस्था/महाविद्यालये,तंत्रनिकेतनने दिलेला नोंदणीकृत क्रमांक जोडुन त्या आधारे विकसित केलेली विद्यार्थ्यांची परिपुर्ण माहिती (Database)  हि प्रस्तावित DBT पोर्टलशी जोडण्यासाठी या योजनेशी संबंधित जिल्हा स्तरावरील सामाजिक न्याय विभागाच्या अधिका-यांना उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

5.आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांचेकडुन या योजने करिता राष्ट्रीयकृत बँकेत एक स्वतंत्र खाते उघडुन त्या द्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परिक्षा फी प्रदाने,निर्वाह भत्ता विद्यावेतने विषयक लाभ राज्यस्तरीय DBT पोर्टल मार्फत अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.सदर बँक खात्या व्यतिरिक्त इतर कोणतेही खाते  जिल्हा/तालुका/विभाग स्तरावर ठेवण्यात आलेले नाही.

6.दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परिक्षा फी प्रदाने,निर्वाह भत्ता विद्यावेतने विषयक योजनांकरिता लाभार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक हा ऑनलाईन अर्जामध्ये नमुद करणे आवश्यक असेल.तसेच ज्या बँक खात्यात पात्र लाभार्थ्यांना रक्कम प्राप्त करुन घ्यावयाची आहे असे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याची संबंधित लाभार्थ्याने खात्री करावी.

 

10.

संपर्कासाठी कार्यालय

मुंबई शहर व उपनगर या जिल्हयांसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग व इतर जिल्हयांमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.

3. दिव्यांग –अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना-

1. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक: अपंग- 2013/प्र.क्र.103/अ.क.2 दि.17 जुन 2014.

 

अ.क्र.

महत्वाचे मुद्दे

तपशील

1.

योजनेचे नाव

दिव्यांग –अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना

2.

योजनेचा उद्देश

समाजातील दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी दिव्यांग व दिव्यांगत्व नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देणे.

3.

योजनेसाठी निधी

महाराष्ट्र राज्य शासन

4.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागु आहे.

किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त  दिव्यांगत्व असलेल्या वधु किंवा वराने दिव्यांगत्व नसलेल्या वधु किंवा वराशी विवाह केलेले विवाहीत दांपत्य.

5.

पात्रतेचे निकष

1.दिव्यांग व अव्यंग विवाहीतांना प्रोत्साहन देण्याची ही योजना किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त  दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीशी दिव्यांगत्व नसलेल्या सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास सदर योजना लागु राहील.

2.दिनांक 1 एप्रिल 2014 या आर्थिक वर्षापासुन नव्याने विवाहीत होणा-या जोडप्यांना सदर योजना लागु होईल.

3. किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त  दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग वधु किंवा वराने दिव्यांगत्व नसलेल्या वधु किंवा वराशी विवाह केल्यास अथवा दिव्यांगत्व नसल्यास वधु किंवा वराने दिव्यांग असलेल्या वधु किंवा वराशी विवाह केल्यास त्यांस अर्थसहाय्य देण्यात येईल.

4.वधु अथवा वराकडे अपंग व्यक्ती (समान संधी,हक्कांचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग) अधिनियम 1995 प्रमाणे किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त  दिव्यांगत्व असल्याचे सक्षम प्राधिका-याने दिलेले  प्रमाणपत्र असावे.

5.दिव्यांग वधु किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

6.विवाहित वधु किंवा वराचा प्रथम विवाह असावा.वधु अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापुर्वी घेतलेली नसावी.

7.विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा.

8.विवाह झाल्यानंतर किमान एका वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद व मुंबई शहर/मुंबई उपनगर या जिल्हयासाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

 

6.

अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत खालीलप्रमाणे सत्यप्रती जोडाव्यात

1.विवाह नोंदणी दाखला.

2.वर/वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले.

3.वर अथवा वधुचे दिव्यांगत्वचे प्रमाणपत्र.

4.वर व वधुचे लग्नाचे एकत्रित फोटो.

5.दोन प्रतिष्ठीत व्यक्तींची शिफारस पत्रे.

6.महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याबाबत अधिवास(Domicilled) प्रमाणपत्र.

7.

योजनेची वर्गवारी

सामाजिक सुधारणा

8.

अर्ज करण्याची पद्धत

लाभार्थ्यांनी शासननिर्णयामध्ये विहीत केलेल्या नमुन्यामध्ये व आवश्यक कागदपत्र अर्जासोबत जोडल्याची पुर्ण खात्री करुन परिपुर्ण  अर्ज जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद आणि मुंबई शहर व मुबई उपनगर या जिल्हयासाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग यांचे कार्यालयाकडे सादर करावेत.

9.

अर्थसहाय्याचे प्रदान

अ.रक्कम रुपये 25000/-चे बचत प्रमाणपत्र.

आ.रुपये 20000/- रोख स्वरुपात.

इ.रुपये 4500/-संसार उपयोगी साहित्य/वस्तु खरेदीसाठी देण्यात येईल.

ई.रुपये 500/-स्वागत सभारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येईल.

 

10.

संपर्कासाठी कार्यालय

मुंबई शहर व उपनगर या जिल्हयांसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग व इतर जिल्हयांमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.

4. दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोज़गारासाठी बीज भांडवल योजना-

1. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक: इडीडी -1087/18863/158/सुधार 2 दि.05 जानेवारी 1989

2. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक: इडीडी -1087/28563/158/सुधार 2 दि. 08 नोव्हेंवर 1989

3. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक-अपंग-2008/प्र.क्र.212/सुधार-3 दि.02 जुलै 2010

 

अ.क्र.

महत्वाचे मुद्दे

तपशील

1.

योजनेचे नाव

दिव्यांग व्यक्तींच्या स्वयंरोज़गारासाठी बीज भांडवल योजना

2.

योजनेचा उद्देश

दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करुन देणे.

3.

योजनेसाठी निधी

महाराष्ट्र राज्य शासन

4.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागु आहे.

किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त  दिव्यांगत्व असलेले अंध, कर्णबधीर ,अस्थिव्यंग प्रवर्गातील वयोगट 18 ते 50 मधील दिव्यांग व्यक्ती.

5.

पात्रतेचे निकष

1.दिव्यांग लाभार्थ्याकडे अपंग व्यक्ती (समान संधी,हक्कांचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग) अधिनियम 1995 प्रमाणे किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त  दिव्यांगत्व असल्याचे सक्षम प्राधिका-याने दिलेले  प्रमाणपत्र असावे.

2.दिव्यांग लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

3.या योजनेखाली ज्या दिव्यांगांना अर्थसहाय्य केले जाईल ते कोठेही नोकर भरतीमध्ये नसावेत .

4.दिव्यांग लाभार्थी हे 18 ते 50 वयोगटातील असावेत.

5.दिव्यांग लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 1,00000/-पर्यंत असावी.

6.

अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

अर्जासोबत खालीलप्रमाणे सत्यप्रती जोडाव्यात

1. अपंग व्यक्ती (समान संधी,हक्कांचे संरक्षण आणि संपुर्ण सहभाग) अधिनियम 1995 प्रमाणे किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त  दिव्यांगत्व असल्याचे सक्षम प्राधिका-याने दिलेले  प्रमाणपत्र.

2.दिव्यांग लाभार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला/वैद्यकीय अधिका-याचा वयाचा दाखला.

3.दिव्यांग व्यक्ती जो प्रकल्प करणार आहे त्या प्रकल्पाचा सनदी लेखापालाचा प्रकल्प अहवाल.

4.दिव्यांग व्यक्तीचा तहसिल कार्यालयाकडुन दिलेला मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.

5.प्रकल्प ज्या ठिकाणी करणार आहे त्या जागेचा 7/12 उतारा.

6.प्रकल्पासाठी जागा भाडे तत्वावर घेणार असल्यास भाडेकरारनामा.

7.प्रकल्प ज्या ठिकाणी करणार आहे तेथील सक्षम प्राधिका-याचे नाहरकत प्रमाणपत्र

8.महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याबाबत अधिवास(Domicilled) प्रमाणपत्र.

7.

योजनेची वर्गवारी

आर्थिक उन्नती.

8.

अर्ज करण्याची पद्धत

लाभार्थ्यांनी विहीत केलेल्या नमुन्यामध्ये व आवश्यक कागदपत्र अर्जासोबत जोडल्याची पुर्ण खात्री करुन परिपुर्ण  अर्ज जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद आणि मुंबई शहर व मुबई उपनगर या जिल्हयासाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग यांचे कार्यालयाकडे सादर करावेत.

9.

अर्थसहाय्याचे प्रदान

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये.1,00000/-एवढी असणे आवश्यक आहे.तसेच प्रकल्प ,खर्चाची मर्यादा रुपये 1,50,000/-एवढी करण्यात आलेली असुन प्रकल्प खर्चाच्या जास्तीत जास्त 20% एवढी रक्कम अनुदान व उर्वरित 80% बँकेकडुन कर्जस्वरुपात देण्यात येते.

10.

संपर्कासाठी कार्यालय

मुंबई शहर व उपनगर या जिल्हयांसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग व इतर जिल्हयांमध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.

5.दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य

 

अ.क्र.

योजना

सविस्तर माहिती

1.

योजनेचे नाव

दिव्यांग व्यक्तींना पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय्य

2.

योजनेचा प्रकार

राज्यशासन

3.

योजनेचा उद्देश

व्यावसायिक प्रशिक्षण पुर्ण केलेल्या दिव्यांगांना त्यांचा स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी वित्तीय सहाय्य

4.

योजनेचा निधी

महाराष्ट्र शासन

4.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे.

अंध, अल्पदृष्टी, कर्णबधीर, अस्थिव्यंग.

5.

पात्रतेचे निकष

1.दिव्यांग लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

2.सरकार मान्य संस्थेकडुन व्यवसाय प्रशिक्षण पास होणे आवश्यक आहे.

5.

अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

1.   विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.

2.   सरकारमान्य संस्थेतून व्यवसाय प्रशिक्षण पास झाल्याचे गुणपत्रक  अर्जासोबत जोडावा.

3.   वर्तणुकीचा दाखला जोडणे आवश्यक.

4.   अपंग व्यक्ती (समान संधी हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 प्रमाणे दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळाचे दिव्यांगासाठीच्या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असल्याचे नमूद केलेले दिव्यांगत्तवाचे प्रमाणपत्र

5.   वयाचा दाखला(शाळा सोडल्याचा दाखला)

6.   व्यवसायासाठी लागणा-या साधनांची यादी व त्यांची अंदाजे किंमत लिहून प्रस्तावाला जोडणे आवश्यक.

7.   विहीत नमुन्यातील करारनामा.

6.

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

दिव्यांग व्यक्तींना उद्योगांसाठी रु.1000/- साधन सामुग्रीच्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाते.साधन सामग्रीमध्ये शिवणयंत्र,कच्चा माल,खडु तयार करणे,मेणबत्त्याबनविणे,केनिंग,आर्मेचर वायडिंग,घडयाळ दुरुस्ती इत्यादी उदयोगासाठी मदत देण्यात येते.

7.

अर्ज करण्याची पध्दत

विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

8.

योजनेची वर्गवारी

दिव्यांगांना रोजगार निर्मिती

9.

संपर्क कार्यालयाचे नाव

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर / उपनगर

6.दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे

 

अ.क्र.

योजना

सविस्तर माहिती

1.

योजनेचे नाव

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे

2.

योजनेचा प्रकार

राज्यशासन

3.

योजनेचा उद्देश

गरजू दिव्यांगांना त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार आवश्यक ती साधने देणे. तसेच त्यांच्या वयोगटानुसार किंवा आवश्यकतेनुसार ती बदलता यावी त्यासाठी कृत्रिम अवयव, तीन चाकी सायकल,एस.एस.सी.नंतरचे शिक्षण घेणा-या अंध विद्यार्थ्यांना टेपरेकॉर्डर व कॅसेट्स   पुरविण्याची योजना आहे.

4.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे.

अंध, कर्णबधीर, अस्थिव्यंग व मतिमंद.

5.

योजनेचे निकष

1.लाभार्थ्यांच्या दरमहा उत्पनाची मर्यादा 1500/-पेक्षा कमी व जास्तीत जास्त 2000/-पर्यंत असावी.

2.अवयव व खरेदीसाठी मासिक उत्पन्न 1500/-पर्यंत असल्यास 100 टक्के आर्थिक मदत मिळेल.मासिक उत्पन्न 1500/- ते 2000/- असेल तर 50 टक्के आर्थिक मदत मिळेल.

5.

अर्जासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

1.   अपंग व्यक्ती (समान संधी हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 प्रमाणे दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळाचे दिव्यांगासाठीच्या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असल्याचे नमूद केलेले अपंगत्तवाचे प्रमाणपत्र

2.   अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

3.   पालकांचे उत्पन्न रु. 1500 पेक्षा कमी असावे. रु.      

1501 ते 2000 पर्यंत उत्पन्न असल्यास अर्जदारांस साधनांची अर्धी रक्कम भरावी लागेल.

4. श्रवणयंत्रासाठी अर्जादारांचे वय 55 वर्षापर्यंत असावे.55 च्या पुढील दिव्यांगास श्रवणयंत्र देण्याची तरतुद नाही.

5. शाळेमध्ये शिकणा-या किंवा नोकरी / कामधंदा

   करणा- या व्यक्तीस श्रवणयंत्र दिले जाते.निरुद्योगी

   व्यक्तीस दिले जात नाही.

6. तीन चाकी सायकलीसाठी अर्जदारांचे वय 18 वर्षपूर्ण

   असावे .

1.   निरुद्योगी व्यक्तीस नियमानुसार तीन चाकी सायकल

दिली जात नाही.

2.   एका पायाने अधु असलेल्या व्यक्तीस नियमानुसार तीन चाकी सायकल दिली जात नाही.दोन्ही पाय निकामी असणा-या व्यक्तीस तीनचाकी सायकल दिली जाते.

3.   कृत्रिम अवयव, कॅलिपर, बुटस इ.साठी अर्ज करताना 

दिव्यांगत्वाच्या दाखल्यात दिव्यांगत्वाचा स्पष्ट उल्लेख असावा.

9. उत्पन्नाचा दाखला

10.जन्म तारखेचा दाखला

11.कृत्रिम अवयव व साधनांच्या बाबतीत कृत्रिम अवयव

   केंद्रापैकी जवळच्या केंद्राचे कृत्रिम अवयव व साधनांचे

   किंमत प्रमाणपत्र

12.श्रवणयंत्रासाठी श्रवण –हासाचा आलेख (कान, नाक,

   घसा, तज्ञ डॉक्टरचा शिक्का सही असलेला) अर्जा

   सोबत जोडावा.

13.अर्जदाराने विहीत नमुन्यात अर्ज परिपूर्ण भरुन सादर

   करणे आवश्यक आहे.

6.

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

1.कृत्रिम अवयव व साधने प्रौढ व्यक्तींना 3 ते 5 वर्षातुन एकदा व 15 वर्षाखालील मुलांना दरवर्षी देण्यात येतील.

2.कृत्रिम अवयव व साधने यासाठी आर्थिक सहाय्याची मर्यादा रु.25 जे जास्तीत जास्त रु.3000/- पर्यंत राहील.

3. कृत्रिम अवयव बसवण्यासाठी आकारण्यात येणा-या खर्चाच्या (Fitting Charges) 15 टक्के ही रक्कम लाभार्थ्यास देण्यात येईल.

4.ज्या दिव्यांगाचे उत्पन्न रु.1200/- पर्यंत आहे.अशा कृत्रिम अवयव बसविण्यासाठी दाखल होणा-या दिव्यांग व्यक्तींना भोजन निवासासाठी प्रतिदीन रु.10 देय असतील.तथापि दिव्यांगास देण्यात येणारी एकुण रक्कम रुपये 100 पेक्षा जास्त असणार नाही.

7.

अर्ज करण्याची पध्दत

विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त्‍ समाज कल्याण मुंबई शहर / उपनगर व  समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सर्व  यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

 

7.दिव्यांग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके

1 . शासन निर्णय क्रमाक इडीडी-1091/2744/के.न.83/सुधार-2 दि.21.10.1991

अ.क्र.

योजना

सविस्तर माहिती

1.

योजनेचे नाव

दिव्यांग  विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके

2.

योजनेचा प्रकार

राज्यशासन

3.

योजनेचा उद्देश

इयत्ता 10 वी व 12 वीच्या परिक्षेत विभागीय परिक्षा मंडळामध्ये प्रत्येक विभाग निहाय गुणवत्ता यादीप्रमाणे अधिक गुण मिळालेल्या प्रत्येकी तीन अंध मुकबधीर,स्पास्टीक/अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना विदयार्थ्यांना   रु. 1000/- रोख रक्कम

2.प्रवास खर्च 100 रु. इतका देण्यात येतो.

3. समारंभासाठी व निवास व भोजनासाठी व छपाई खर्च यासाठी  अनुदान देण्यात येते.

4.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे.

अंध, मुकबधीर, स्पास्टीक / अस्थिव्यंग.

5.

योजनेच्या प्रस्तावासोबत सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

1.   अपंग व्यक्ती (समान संधी हक्कांचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम 1995 प्रमाणे दिव्यांग  व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळाचे दिव्यांग योजनेचा लाभ घेण्यास पात्र असल्याचे नमूद केलेले दिव्यांगत्त्वाचे प्रमाणपत्र

2.   मागील वर्षांचे गुणपत्रक

3.   दिव्यांगत्व दिसेल असा फोटो.

6.

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातून इयत्ता 10 वी व 12 वी उत्तीर्ण होणा-या प्रथम तीन क्रमांकाच्या प्रत्येकी तीन दिव्यांग विद्यार्थ्यांना रु. 1000/- रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येतो.

7.

अर्ज करण्याची पध्दत

विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.

8.

योजनेची वर्गवारी

शैक्षणिक

9.

संपर्क कार्यालयाचे नाव

संबंधित प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण विभाग यांचे कार्यालय.