सर्वेक्षण नमुना ज्या दिव्यांग व्यक्ती स्वतःची माहिती नोंदविण्यास इच्छुक आहेत त्यांना त्याची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविणे सुलभ व्हावे याकरिता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदर नमुन्यामध्ये दिव्यांग व्यक्तींनी भरलेल्या माहितीच्या अचूकतेची पडताळणी आयुक्तालयामार्फत करण्यात येणार नसून माहितीच्या सत्य सत्यतेची सर्वस्वी जबाबदारी माहिती भरणाऱ्या व्यक्तीवर राहील.
सदर नमुन्यात दिव्यांग व्यक्तींनी भरलेल्या माहितीच्या आधारे घेतलेले कोणतेही लाभ सोयीसुविधा अथवा सवलती त्यांना देय होणार नाहीत. याकरिता त्यांना स्वतंत्रपणे अर्ज किंवा आवेदन सादर करावे लागेल व त्याची विहित पद्धतीने पडताळणी करून संबंधित स्तरावरील कार्यालयाद्वारे पुढील कार्यवाही करण्यात येईल.
प्रस्तुत सर्वेक्षणाचा उद्देश राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या माहितीचे संकलन करून त्याआधारे दिव्यांग कल्याण उपक्रमांची एकंदरीत दिशा ठरविणे इतकाच मर्यादित आहे.